Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अयोध्या निकालानंतर ह्या गोष्टी करू नका...

अयोध्या निकालानंतर ह्या गोष्टी करू नका...
, शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (10:54 IST)
जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका. 
अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुकावतील असे मेसेज सोशल मिडियावर फॉरवर्ड करु नका. 
निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये. 
गुलाल उधळू नये 
फटाके वाजवू नयेत. 
मिरवणूक रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये. 
महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये. 
निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये. 
कोणतंही वाद्य वाजवू नये. 
कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडिओ, फोटो पुन्हा पोस्ट करू नये 
अफवा पसरवू नये. 
वरील सूचनांचे उल्लंघन करुन जातीय तणाव निर्माण केल्यास, भावना भडकवल्यास भारतीय दंड संहिता कलम आणि इतर कायद्यांन्वये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

#Ayodhya Verdict Live Update : काही मिनिटांमध्ये अयोध्या प्रकरणी निर्णय