Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामलल्लाच्या प्राण प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन, अयोध्येच्या राममंदिरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन

Ayodhya Ram lalla
, शनिवार, 11 जानेवारी 2025 (10:27 IST)
Ayodhya News: अयोध्येच्या भव्य राम मंदिरात भगवान रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मंदिराचा पहिला वर्धापन दिन भव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी श्री राम जन्मभूमी ट्रस्टने तयारी केली आहे.
ALSO READ: आज मुंबई रामनामाने गुंजणार, श्री रामलला मूर्तीच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधींचे आयोजन
मिळालेल्या माहितीनुसार अयोध्येच्या भव्य राम मंदिरात भगवान रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, राम मंदिराला आज म्हणजेच 11 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होईल. यानिमित्ताने, श्री राम जन्मभूमी ट्रस्टने मंदिराचा पहिला वर्धापन दिन भव्य पद्धतीने साजरा करण्याची तयारी केली आहे. या पवित्र दिवशी, भगवान रामलल्ला पिवळ्या वस्त्रांमध्ये सजले जाणार आहे. ज्यांचे विणकाम आणि भरतकाम सोनेरी आणि चांदीच्या धाग्यांनी केले आहे. तसेचज हा महोत्सव 11 ते 13 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाईल ज्यामध्ये सामान्य लोकांचाही समावेश असेल. गेल्या वर्षी, सामान्य लोकांना या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.

अयोध्येतील भगवान राम मंदिराचे उद्घाटन गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हिंदू कॅलेंडरनुसार, ज्या दिवशी रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली ती पौष शुक्लाची द्वादशी तिथी होती. या वर्षी २०२५ मध्ये पौष शुक्ल द्वादशी ११ जानेवारी म्हणजेच शनिवारी येत आहे. म्हणून प्राण प्रतिष्ठाचा वार्षिक वर्धापन दिन या दिवशी साजरा केला जाईल. आजपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाला वार्षिक द्वादशी असेही म्हटले जात आहे. या संदर्भात, उत्तर प्रदेश सरकारने गेल्या शुक्रवारी एका निवेदनात म्हटले होते की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील आणि रामलल्लाचा अभिषेक करतील. आज या सोहळ्याची सुरुवात रामलल्लाच्या अभिषेकाने होईल. आज सकाळी 10 वाजता रामलल्लाचा अभिषेक आणि पूजेची प्रक्रिया सुरू होईल. प्राणप्रतिष्ठेत ज्याप्रमाणे अभिषेक केला गेला त्याचप्रमाणे प्रतिष्ठा द्वादशीला रामलल्लाला पंचामृत, शरयू नदीचे पाणी इत्यादींनी अभिषेक केला जाईल. अभिषेक पूजेनंतर दुपारी 12:20वाजता राम लल्लाची आरती होईल.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: मुंबईतील जुहू परिसरात चार बांगलादेशी नागरिकांना अटक