आज अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या मालकी हक्कांसंदर्भात निकाल लागणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे तीन सदस्यीय खंडपीठ हा निकाल दुपारी सुनावणार आहे.
या निमित्त देशभरातील 34 संवेदनशील शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, अयोध्येला तर लष्करी तळाचे स्वरुप आले आहे.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, इंदूर, लखनौ, हैदराबाद, बेंगलुरु यासह अनेक राज्यातील महत्वाच्या शहरांमधील सुरक्षा व्यवस्थ आणखी वाढवण्यात आली आहे.
मुंबईमध्ये पोलिसांना तैनात करण्यात आले असून, दंगा रोखण्यासाठी सीआरपीएफ व दंगा विरोधी पथकं रस्त्यावर दिसून येत आहेत.