Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळावर शनि देवाचा आशीर्वाद कायम राहील, निवडा हे प्रभावशाली नाव

Shani name for baby boy
, सोमवार, 26 मे 2025 (17:05 IST)
सामान्य लोकं शनी हे नाव ऐकताच घाबरतात. शनीला क्रूर ग्रह मानलं जातं परंतु खरं तर असे आहे की शनी हा न्यायकारक असून माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. अशात तुम्ही बाळासाठी युनिक नाव शोधत असाल आणि त्यावर नेहमी शनिदेवाची कृपा असावी असे वाटत असेल तर शनिदेवाशी संबंधित एखाद्या नावाची निवड करू शकता. बाळासाठी शनिदेवाशी संबंधित काही नावे त्यांच्या अर्थासह दिली आहेत. ही नावे शनिदेवाच्या गुणधर्मांशी, त्यांच्या प्रभावाशी किंवा पौराणिक संदर्भांशी जोडलेली आहेत.
 
कौस्तुभ- रत्न किंवा खजिना, शनिदेवाचा संबंध नीलम रत्नाशी आहे, त्यामुळे हे नाव त्यांच्याशी सुसंगत आहे
कपिल - तपकिरी किंवा गडद रंग
सुशांत - शांत
गदिन - गदाधारी, शनिदेव आणि भगवान कृष्णाशी संबंधित नाव
गगन - आकाश
गगनदीप - आकाशातील प्रकाश
जयेन - जिंकणारा
नील - नीलमणी सारखा
गगनेश - शनिदेवाशी निगडित
सारंग- संगीत वाद्य, प्रेम, स्नेह
सचित- चेतना, शुद्ध जागरूकता
सचेतन- तर्कसंगत 
सचिन- शुद्ध अस्तित्व
भैरव- भयंकर किंवा शक्तिशाली, शनिदेवाचे एक रूप भैरवाशी जोडले जाते, जे त्यांच्या दैवी शक्तीचे प्रतीक आहे
सचिव - सहायक
धीर - धैर्य किंवा शांत चित्त असणारा
भानू- तेजस्वी किंवा गुणवान शासक
भव्य: भव्य किंवा जड
सर्वेश: शनिदेवाचे सर्वेश नावाचे एक नाव देखील आहे
महेश : शिव आणि शनिदेवाच्या नावावर हे नाव ठेवू शकता.
पवित्र: शुद्ध असणे
शरण्य: जो आश्रय देतो
वरेन्या: सर्वात उत्कृष्ट
निलांबर: निळा पोशाख किंवा निळा शरीर असलेला
कृष्ण - शनिदेवाचा रंग गडद असल्याने हे नाव त्यांच्याशी संबंधित आहे
सौरभ- सुगंध किंवा सूर्याचा पुत्र
छाय- सावली, शनिदेवाची आई छाया देवी आहे, त्यामुळे हे नाव शनिदेवाशी जोडले जाते
मंद - हळू किंवा शांत, शनिदेवाच्या मंद गती आणि शांत स्वभावाचे प्रतीक
टीप - नाव निवडताना, ते आपल्या सांस्कृतिक आणि कौटुंबिक परंपरांना अनुरूप आहे की नाही हे तपासा. तसेच, ज्योतिषशास्त्रानुसार नाव ठेवण्यापूर्वी ज्योतिषीचा सल्ला घेणे उचित ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shani Jayanti 2025 शनि जयंतीला शनिदेवांना हे नैवेद्य अर्पण करा