Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा 2019 पहिल्या टप्प्याचं मतदान नागपुरात 9 वाजेपर्यंत 11% मतदान

लोकसभा 2019 पहिल्या टप्प्याचं मतदान LIVE: नागपुरात 9 वाजेपर्यंत 11% मतदान
, गुरूवार, 11 एप्रिल 2019 (10:21 IST)
एकूण 91 जागांसाठी आज होत असलेल्या या मतदानात 1,279 उमेदवारांचं नशीब मतपेटीत कैद होणार आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, गडचिरोली-चिमूर, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर या 7 मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पुढच्या तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
 
यंदा प्रथमच बहुतांश मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच EVMसह Voter-Verifiable Paper Audit Trail किंवा VVPAT जोडण्यात येणार आहे.
 
सर्वांत ताजे अपडेट्स इथे पाहा -
सकाळी 9.45 वाजता -
नागपुरात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 11% मतदान
 
सकाळी 7.50 - गडचिरोलीमध्ये मतदान सुरू
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही शांततेत मतदान सुरू झालं. गडचिरोलीमध्ये तर मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहेत.
 
सकाळी 7.05 वाजता - सरसंघचालकांचं मतदान
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं मतदान. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "मतदान करणं आपली कर्तव्य आहे. प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे."
 
गेल्या निवडणुकांमध्ये विदर्भातल्या दहाही जागांवर सत्ताधारी भाजप-सेना युतीने काहीशा कमकुवत आणि गटातटांत विभागलेल्य़ा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर विजय मिळवला होता. 11 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या मतदानासाठी विदर्भ हळूहळू तयार होत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मतदान कसं करतात, जाणून घ्या थोडक्यात