Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Lokmanya Tilak Express: मुंबईहून निघालेल्या रेल्वेचे 8 डबे घसरले, 20 जण जखमी

Lokmanya Tilak Express: मुंबईहून निघालेल्या रेल्वेचे 8 डबे घसरले, 20 जण जखमी
, गुरूवार, 16 जानेवारी 2020 (11:56 IST)
मुंबईहून भुवनेश्वरकडे निघालेल्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे 8 डबे रेल्वे रुळावरून घसरले. या घटनेत किमान 20 जण जखमी झाल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
 
सकाळी सातच्या सुमारास ओडिशातील कटकजवळ सालनगाव आणि नेरगुंडी स्टेशनच्यामध्ये ही घटना घडली.
 
जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
या घटनेनंतर पाच रेल्वेंचं वेळापत्रक आणि मार्ग बदलण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिकला एडूरिसोर्स स्टार रेटिंग्स २०२० कडून मिळाले सहा स्टार!