5 ऑगस्टनंतरचे काश्मीरमधील सुरक्षा प्रतिबंध आणि नोव्हेंबरमधील अवकाळी बर्फवृष्टी याच्यामुळे सफरचंदाच्या उद्योगाचं जवळपास 7 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी, योगेंद्र यादव आणि व्ही. एम. सिंग यांच्या इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीच्या (AIKSCC) बॅनरखालील प्रतिनिधीमंडळामध्ये काश्मीर दौरा केला.
त्यांच्या मूल्यांकनानुसार, "5ऑगस्ट नंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षेसाठी जी बंधनं लादली गेली, त्यामुळे वाहतूक उद्योग तसंच खरेदी-विक्रीच्या बाजारपेठा यांच्यावर हंगामाच्या सुरुवातीलाच मोठा परिणाम झाला. पेअर, चेरी आणि द्राक्षं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं जवळजवळ संपूर्ण नुकसान झालं."
दरम्यान, सरकारच्या स्वतःच्या अंदाजानुसार 23,640 हेक्टरपैकी जवळपास 35% जमिनीवरील पिकांचं बर्फवृष्टीमुळे नुकसान झालं आहे.