Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदर्श घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू

आदर्श घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू
, शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (12:45 IST)
कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
 
बुधवारी ईडीनं (अंमलबजावणी संचालनालय) पुन्हा एकदा आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरु केली आहे. ईडीचे अधिकारी बुधवारी आदर्श गृहनिर्माण सोसायटीत दाखल झाले आणि त्यांनी त्यातील घरांची मोजणीही केली.
 
आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचं समोर आल्यानंतर नोव्हेंबर 2010मध्ये अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.
 
आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आहे. या सरकारमध्ये चव्हाण यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशातच या चौकशीमुळे त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ईडीने आपण कोणतीही नव्याने चौकशी सुरु केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आदर्शच्या बाबतीत कोणतीही चौकशी नव्याने सुरु झालेली नाही. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांकनाला कोणताही आधार नसल्याचं ईडीने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

४५० हुन अधिक विद्यार्थी आणि शामक दावर व्हिक्टरी आर्ट फाउंडेशनने साजरा केला जागतिक अपंगत्व दिन.!