साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. जर नरेंद्र दाभोळकर आणि एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांचे मारेकरी सापडले असते तर भाजपने त्यांना देखील तिकीट दिले असते अशी बोचरी टीका पवार यांनी केली.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल जे विधान केले आहे. त्या बद्दल भाजपकडून कोणी बोलण्यास तयार नसून ही निषेधार्ह बाब आहे. असंही ते म्हणाले.
बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवारांची प्रचार सभा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरूर मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.