बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेख हसिना शुक्रवारी ढाक्याहून नवी दिल्लीला रवाना होणार आहेत.
शेख हसिना यांच्यासाठी भाषण लिहिणारे एम नजरुल इस्लाम यांनी BSS या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. "पंतप्रधान शेख हसिना शुक्रवारी दुपारी 4 वाजता ढाक्याहून नवी दिल्लीला रवाना होतील. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर त्या 9 जूनला बांगलादेशला परततील," असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना फोन करून शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं होतं. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला बहुमत मिळालं आहे. एनडीए आघाडीनं 543 पैकी 293 जागा जिंकल्या आहेत.