Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

भाजपच खरी तुकडे तुकडे गँग - सुखबीरसिंग बादल

BJP
, बुधवार, 16 डिसेंबर 2020 (13:39 IST)
भाजप देशातील खरी तुकडे तुकडे गँग असून त्यांनीच शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी केलाय.  
 
"भाजपने राष्ट्रीय एकतेचे तुकडे केले. निर्लज्जपणे मुस्लिमांविरुद्ध हिंदूंना भडकावलं. आता ते आपल्या शीख बांधवांविरोधात असं करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजप जातीय आगीत ढकलत आहे", अशी टीका बादल यांनी केली.
 
"आंदोलनात ज्येष्ठ नागरिक महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या खलिस्तानी दिसतात का? असा सवाल बादल यांनी सरकारला केला आहे. शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची हिंमत कशी झाली? तो हक्क भाजपला कुणी दिला? शेतकऱ्यांनी देशासाठी जीवन समर्पित केलं आहे. जे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत तेच गद्दार आहेत", असं बादल म्हणालेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संभल येथे भीषण रस्ता अपघात, रोडवेज बस आणि टँकरची टक्कर, 7 ठार, 25 जखमी