काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातल्या भारत जोडो यात्रेचं भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कौतुक केलंय. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.
येत्या 20 नोव्हेंबरला राहुल गांधींची भारत जोडो यात्र महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश करेल. या पार्श्वभूमीवर सुमित्रा महाजनांच्या कौतुकपर वक्तव्याला महत्त्वं आलंय.
सुमित्रा महाजन म्हणाल्या की, “राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारत समजून घेतील. आपण लोकशाहीत आहोत आणि लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण असते.
विरोधी पक्षही मजबूत असला पाहिजे, जो संपूर्ण भारताला डोळ्यासमोर ठेवून बोलला पाहिजे. आम्ही जेव्हा विरोधात होतो, तेव्हा अटलजी, अडवाणी देशासाठी बोलत होते. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती.”
“मी जेव्हा प्रवचन करायचे तेव्हा महापुरुषांचे उदाहरण देत होते. जेवढ्या महापुरुषांनी देशासाठी काम केलं, ते आधी देश फिरले. त्यानंतर कामाला सुरुवात केली. राहुल गांधींची देश फिरायची इच्छा झाली, ही खूप चांगली गोष्ट आहे,” असंही सुमित्रा महाजन म्हणाल्या.
Published By -Smita Joshi