भाजपचे सावरकर प्रेम म्हणजे ढोंगीपणा - संजय राऊत

भारतीय जनता पार्टीचे सावरकर प्रेम म्हणजे ढोंगीपणा आहे. साडेपाच वर्षे मोदींचे सरकार केंद्रात आहे. सावरकरांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी आम्ही केंद्राकडे करत आहोत मग आतापर्यंत का दिला नाही, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्द्ल केलेल्या विधानावरून वाद सुरू आहे. त्यावर राऊत यांनी सावरकरांबद्द्ल महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या लोकांनी राहुल गांधी यांना माहिती देणं आवश्यक असल्याचे नमूद केले. मुंबईतील सावरकरांचे स्मारक केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच असल्याचं त्यांनी सांगितलं. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख राहुल गांधींना न्यायालयात खेचणार