मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पूरग्रस्त महिलेला दिलेल्या उत्तरामुळे त्यांच्यावर टीका झाली.
त्यावर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "आपण वडिलधारे आहोत त्या नात्यातून मी त्यांना बोललो."
"मी लोकांसोबत थेट संवाद साधतो. जर वडीलकीच्या नात्यातून आपण असं बोललो असू तर त्यात गैर काही नाही," असं जाधव यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
25 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण शहरात पूरग्रस्तांची विचारपूस करत असताना, एका महिलेनं आपला आक्रोश व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "काहीही करा, पण आम्हाला मदत करा, फुल ना फुलाची पाकळी तरी द्या. आमदारांचा दोन महिन्यांचा पगार मदतीसाठी फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या."
उद्धव ठाकरे या व्यथा ऐकत असताना, आमदार भास्कर जाधव यांनीच महिलेच्या आक्रोशाला उत्तर दिलं.
या महिलेचं नाव ज्योती भोजने असं आहे. त्यांनी देखील असं म्हटलं आहे की भास्कर जाधव यांच्या बोलण्याचा आपल्याला राग आलेला नाही.
"भास्कर जाधव हे नेहमी सगळ्यांना मदत करतात. त्यांचं बोलणंच तसं आहे. पण त्यांचा उद्देश काही वाईट नव्हता. ते वडीलकीच्या नात्यातून आपल्याशी तसं बोलले," असं भोजने म्हणाल्या.
भास्कर जाधव म्हणाले, "हे बघा, आमदार खासदार पाच महिन्यांचा पगार देतील, पण त्याने काही होणार नाही. चला चला.. बाकी काय.. तुझा मुलगा कुठंय.. अरे आईला समजव... आईला समजव.. उद्या ये.."
दरम्यान, अतिवृष्टीमुळे ज्या लोकांचं घर किंवा दुकान पाण्याखाली गेलंय त्यांना प्राथमिक 10 हजार रुपये मदत देण्यात येईल, अशी घोषणा मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
तर अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी घोषणा केलीय की, 6 जिल्हयांमध्ये जी पूरबाधित कुटुंब आहेत, त्यांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो तूर डाळ, 5 लीटर केरोसीन मोफत देण्यात येणार आहे.
भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर समाजमाध्यमांमध्ये उमटल्या प्रतिक्रिया
भास्कर जाधवांचं या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होतेय.
भास्कर जाधव म्हणाले, "हे बघा, आमदार खासदार पाच महिन्यांचा पगार देतील, पण त्याने काही होणार नाही. चला चला.. बाकी काय.. तुझा मुलगा कुठंय.. अरे आईला समजव... आईला समजव.. उद्या ये.."
दरम्यान, अतिवृष्टीमुळे ज्या लोकांचं घर किंवा दुकान पाण्याखाली गेलंय त्यांना प्राथमिक 10 हजार रुपये मदत देण्यात येईल, अशी घोषणा मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
तर अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी घोषणा केलीय की, 6 जिल्हयांमध्ये जी पूरबाधित कुटुंब आहेत, त्यांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो तूर डाळ, 5 लीटर केरोसीन मोफत देण्यात येणार आहे.
तर भास्कर जाधव यांनी पूरग्रस्तांवर हात उगारल्याचा आरोपही भाजपकडून केला जातोय.
याबाबतचं ट्वीट भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
"पूरग्रस्त जनतेने आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडायच्या की नाहीत? नसतील तर मुख्यमंत्री काय दमदाटी करायला गेले होते का?" असा सवाल भाजप आमदार राम सातपुते यांनी केलाय.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय की, "माझी कोकणातील भगिनी आपल्यासमोर व्यथा मांडण्यासाठीच येत होती ना? तिचे अश्रू पुसणे सोडा, तिच्यावरती हात उचलला जातोय. हा 'पुरुषार्थ' दाखवल्यामुळे धन्य झाले असतील मा. बाळासाहेब."
दरम्यान, महिलेशी बोलल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी त्यांची बाजू अद्याप मांडली नाहीय.
भास्कर जाधव यांची फेसबुक पोस्ट
कालच्या दौऱ्याबाबत भास्कर जाधव यांनी फेसबुकवर म्हटलं आहे की, "राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवसाहेब ठाकरे यांनी आज चिपळूणमध्ये पूरस्थितीनंतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पुरामुळे झालेले नुकसान आणि प्रचंड हाल यामुळे येथील सामान्य नागरिक, व्यापारी यांच्यामध्ये साहजिकच तीव्र संतापाची भावना होती."