मी नेहमीच माझे राजकीय गुरू म्हणून माझ्या वडिलांचा उल्लेख केला आहे. आज ते आपल्यात नाही. त्यांच्यानंतर आता माझे राजकीय गुरु हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. गुरुदक्षिणा म्हणून त्यांना मी माझा अंगठा द्यायला तयार आहे, पण तो अर्जुनासाठी असावा, असं विधान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे केलं आहे.
बीडमध्ये महाजनादेश यात्रेची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं. मुख्यमंत्र्यांनी अर्जुनासाठी अंगठा मागावा असं म्हणताना पंकजा मुंडेंचा रोख हा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याकडे होता.
बीडमधील महाजनादेश यात्रेत विनायक मेटेंच्या सहभागावरून पंकजा मुंडे आणि मेटे यांच्यामध्ये मानापमान नाट्य रंगलं होतं. या वादाचा संदर्भ पंकजा मुंडेंच्या वक्तव्याला होता.