Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना आणि सेक्स : लॉकडाऊन मध्ये सिंगल आणि एकटे असाल तर ‘सेक्स बडी शोधा'

कोरोना आणि सेक्स : लॉकडाऊन मध्ये सिंगल आणि एकटे असाल तर ‘सेक्स बडी शोधा'
, बुधवार, 20 मे 2020 (14:36 IST)

कोरोना लॉकडाऊनच्या काळात जर तुम्ही सिंगल असाल आणि त्यामुळे एकटे आहेत, तर नेदरलँड्स सरकारचा तुमच्यासाठी एक सल्ला आहे - एक ‘सेक्स बडी’ शोधा.

 
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नवीन नियमावलीमध्ये देण्यात आलेल्या या एका सल्ल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
 
‘सेक्स बडी’ म्हणजे लैंगिक संबंधांसाठी जोडीदार, असं आपल्याला म्हणता येईल.
 
नेदरलँडमधील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण संस्थेचं (RIVM) म्हणणं आहे की, एकटे राहणाऱ्यांनी सोबतीसाठी दुसरी व्यक्ती पाहावी. मात्र कुणाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असेल, तर त्या व्यक्तीशी शारीरिक जवळीक टाळावी.
 
एकटे राहणाऱ्यांना लैंगिक संबंधांबाबत कुठल्याही सूचना सरकारकडून देण्यात आल्या नाहीत, अशी टीका झाल्यानंतर डच सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमांमध्ये याबाबत सूचना देण्यात आल्या.
 
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी नेदरलँड्समध्ये 23 मार्चपासूनच लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. हा लॉकडाऊन ‘इंटेलिजेन्ट’ म्हणजे हुशारीने आणि ‘टार्गेटेड’ म्हणजेच गरज असेल तिथेच लक्ष्य करून लादण्यात आल्याचं नेदरलँडनं म्हटलंय.
 
मात्र, शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत नेदरलँडमध्ये लॉकडाऊनचे नियम फारच सौम्य आहेत. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना सोशल डिस्टन्सिंग पाळून परवानगीही दिली जातेय.
नेदरलँडचे लॉकडाऊनसंदर्भात नवे नियम घोषित
चार दिवसांपूर्वी म्हणजे 14 मे रोजी लॉकडाऊनसंदर्भात नेदरलँडमधील सरकारनं नव्या नियमांचं पत्रक जारी केलं.
 
या पत्रकात RIVMने म्हटलंय की, तुम्ही एकटे (सिंगल) असाल तर तुम्हाला शारीरिक जवळिकीची गरज आहे, यात नक्कीच तर्क आहे. मात्र लैंगिक संबंधासाठी कुणाच्या संपर्कात आला असले, तरी कोरोना व्हायरसा संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.
 
याबाबत RIVMने आणखी काही सूचनाही केल्यात, “हे सर्व सुरक्षितरीत्या कसं होईल, याची दोघे मिळून चर्चा करा. म्हणजेच ज्यांना कुठलाही आजार नसेल, अशा लोकांशीच शारीरिक किंवा लैंगिक संपर्क प्रस्थापित करा.”
 
दोन्ही व्यक्ती इतरांच्या किती संपर्कात आलेत, याचीही खात्री करून घ्या. कारण जेवढ्या जास्त लोकांच्या संपर्कात, तेवढी कोरोना व्हायरस पसरण्याची भीती अधिक असते, असं RIVMने सांगितलंय.
 
ज्यांच्या जोडीदाराला संशय आहे की, त्यानं कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीशी संबंध ठेवलाय, त्यांच्यासाठीही RIVMने सूचना जारी केल्यात.
 
“जर तुमच्या जोडीदाराला कोरोना व्हायरसच्या संशयामुळं अलगीकरण कक्षात ठेवलं असेल, तर त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवू नका. स्वत: किंवा इतरांसोबत शक्य तितकं अंतर राखून संबंध ठेवा,” असं सांगतानाच "कामुक कथावाचन" आणि "हस्तमैथुन" असे पर्यायही सूचवले गेले आहेत.
लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी पावलं
 
नेदरलँडमध्ये आतापर्यंत पाच टप्प्यात लॉकडाऊन झालं. गेल्या सोमवारपासून नेदरलँडमध्ये लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी तयारी सुरू झालीय.
 
याचाच पहिला भाग म्हणून नेदरलँडमध्ये ग्रंथालयं, सलून आणि ब्युटी पार्लर, मसाज सलून आणि कामामुळे येणाऱ्या ताणावर उपचार (occupational therapy) देणारी ठिकाणं 11 मेपासून सुरू करण्यात आलीत.
 
कोरोनाच्या रुग्ण आणि मृतांच्या संख्येचा आलेख खाली आणण्यात नेदरलँडला यश आल्याचं डच पंतप्रधान मार्क रट्ट यांनी म्हटल्यानंतर लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी पावलं उचलण्यात आली.
 
नेदरलँडमध्ये आतापर्यंत एकूण 44 हजार रुग्ण आणि 5 हजार 700 हून अधिक मृत्यूंची नोंद झालीय.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CBI अलर्ट : स्मार्टफोन युझर्सला Cerberus व्हायरसचा धोका