जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या डॉक्टरच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आहे.
रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना याविषयी सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला.
दरम्यान जर्मन सरकारनं दोनपेक्षा अधिका लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 3 लाखांहून अधिक झाली आहे. यांतील 13 हजार जणांचा मृत्यू, तर 93 हजार रुग्णांवरील उपचार यशस्वी ठरले आहेत.