Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोनाल्ड ट्रंप म्हणतात जो बायडेन 'अमेरिकेचं स्वप्न' उद्ध्वस्त करतील

डोनाल्ड ट्रंप म्हणतात जो बायडेन 'अमेरिकेचं स्वप्न' उद्ध्वस्त करतील
, शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (13:35 IST)
जर जो बायडेन निवडून आले तर ते अमेरिकेचं स्वप्न उद्धवस्त करतील, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
 
आपले विरोधक अमेरिकेच्या श्रेष्ठत्वाचे भंजक आहेत असाही घणाघाती आरोप ट्रंप यांनी केला. डेमोक्रॅटस हिंसक अराजकवादी आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली. गुरुवारी रात्री त्यांनी प्रचारसभेत विरोधकांचा समाचार घेतला.
 
कोरोना व्हायरसच्या काळात अर्थव्यवस्थेची वाताहत झाली तसंच आफ्रिकन वंशाच्या नागरिकांचा पोलिसांमुळे मृत्यू झाल्यावर समाजात दुही पसरवली, असा आरोप ट्रंप यांच्यावर त्यांचे विरोधक करत आहेत.
 
ट्रंप काय म्हणाले?
आपल्या पक्षानं दिलेलं पुनर्नांमाकन ट्रंप यांनी गुरुवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये स्वीकारलं.
 
"अमेरिकेचं स्वप्न आम्ही वाचवू शकू का? किंवा आपलं भविष्य उद्ध्वस्त करायला समाजवादी अजेंडा पुढे रेटण्यासाठी लोक परवानगी देतात हे निवडणूक ठरवेल," असं ते यावेळी म्हणालेत.
 
"कायद्याचं पालन करणाऱ्या अमेरिकन जनतेचं रक्षण आपण करु शकू की नाही हे तुमचं मत ठरवेल. हिंसक अराजकवाद्यांना, आदोलकांना, नागरिकांना धमकवणाऱ्या गुन्हेगारांना खुली सूट मिळेल का हे सुद्धा तुमचं मत ठरवेल," असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.
 
ब्लॅक लाइव्ह मॅटर्सच्या आंदोलकांनी देशभरात आंदोलन करण्याकडे आणि व्हाईट हाऊससमोर जमण्याकडे अंगुलीनिर्देश करत ट्रंप यांनी ही टीका केली आहे.
 
गेल्या आठवड्यात डेमोक्रॅट्सच्या प्रचारामध्ये अमेरिकेचं चित्र वंशभेदाची, आर्थिक भेदभावाची जागा असं रंगवण्यात आलं होतं, असाही आरोप त्यांनी केलाय.
 
"आपल्या देशाची प्रतिमा खराब करण्यात इतका वेळ घालवणारे डेमोक्रॅट्स आपल्याकडे नेतृत्व द्या असं कसं म्हणू शकतात," असा मी तुम्हाला प्रश्न विचारतो.
 
ते म्हणाले, त्यांच्या डाव्या मागास विचारांमध्ये अमेरिका हे पृथ्वीवरील सर्वांत जास्त मुक्त राष्ट्र नसून पापांसाठी शिक्षा देण्यात यावी असं राष्ट्र आहे.
 
व्हाईट हाऊसच्या जवळ प्रचार केल्याबद्दल ट्रंप यांच्यावर आरोप होत आहेत.
 
मास्क न वापरता 1500 हून अधिक लोक एकमेकांजवळ बसल्याबद्दलही अमेरिकेतील वर्तमानपत्रांनी टीका केली आहे.
 
डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमध्ये आणखी 4 वर्षं राहणार की नाही हे अमेरिका 3 नोव्हेंबरला ठरवेल.
 
डोनाल्ड ट्रंप यांना आव्हान दिलं आहे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी. बराक ओबामांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात उपराष्ट्राध्यक्ष असणारे बायडन हे 1970च्या दशकापासून अमेरिकेच्या राजकारणात आहेत.
 
निवडणुकीचा हा दिवस जसजसा जवळ येईल तसतशा सर्वेक्षण करणाऱ्या संस्था अमेरिकन नागरिकांची पसंती कोणत्या उमेदवाराला आहे यासाठीच्या पाहण्या करू लागतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर