Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडणूक आयोगाने फेटाळले EVM बाबतचे सर्व आरोप

निवडणूक आयोगाने फेटाळले EVM बाबतचे सर्व आरोप
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या सातही फेऱ्या पार पडल्या आहेत. निवडणुकीचा निकालही काही तासांवर येऊन ठेपला आहे. विरोधकांकडून मात्र अजूनही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या (EVM) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.
 
आज सकाळीच ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडूंनी EVMच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "एक्झिट पोलच्या गॉसिपवर माझा विश्वास नाही. एक्झिट पोलच्या गोंधळात हजारो ईव्हीएम बदलण्याचा किंवा त्यांच्यात फेरफार करण्याचा डाव दिसतोय," असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
 
या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं विरोधकांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत.
 
उत्तर प्रदेशमध्ये EVM मशीन अधिकृत स्टोरेज हाऊसमध्ये ठेवण्याऐवजी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याचा आरोप केला गेला होता. त्यासंबंधीचे अनेक व्हीडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.
 
निवडणूक आयोगानं मात्र अशा कोणत्याही घटना घडल्या नसून सर्व EVM हे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचं स्पष्ट केलं.
 
"मतदान झालेली EVM आणि VVPAT सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये सीलबंद करण्यात आले असून त्याचं चित्रीकरणही केलं गेलंय. जिथं EVM ठेवली जातात, त्या स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि CAPF ची सुरक्षा व्यवस्थाही आहे. उमेदवार आणि त्यांच्या एका प्रतिनिधीला या खोलीच्या सीसीटीव्ही फुटेजवर नजरही ठेवता येते," असं निवेदन निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
 
गाझीपूर इथं EVM मध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला होता. हा आरोप फेटाळण्यात आला आहे.
 
चंदौली इथं EVM मध्ये फेरफार करण्यात आल्याचाही आरोप होता. या आरोपात काही तथ्य नसल्याचं म्हणत आयोगाने हा आरोप फेटाळला आहे. EVM संबंधी सर्व गोष्टी आम्ही प्रक्रियेनुसारच केल्या आहेत, असं आयोगानं म्हटलं आहे.
 
डोमारियागंज या ठिकाणी EVM संबंधी करण्यात आलेल्या तक्रारीबद्दल आयोगाने म्हटलं आहे, की ही तक्रार अनावश्यक आहे. EVMची तक्रार दाखल करून लोकांनी निदर्शनं केली ती अनावश्यक होती. एसपी आणि कलेक्टरनी समजूत काढल्यानंतर जमाव शांत झाला, असं आयोगाने म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अखेर विद्यार्थ्यांनी 15 दिवसांनी आंदोलन मागे घेतले