मावळते लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची सोमवारी (30 डिसेंबर) 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'पदी नियुक्ती करण्यात आली.
लष्करप्रमुखपदाची कारकीर्द संपवून मंगळवारी (31 डिसेंबर) निवृत्त झाल्यानंतर ते पहिले 'सीडीएस' म्हणून सूत्रं स्वीकारतील.
लष्कर, हवाई दल आणि नौदलात समन्वय साधण्यासाठी आतापर्यंत 'जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी' होती. तिन्ही दलांच्या प्रमुखांतील ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्यास ते पद दिलं जायचं. याऐवजी 'सीडीएस' पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
याशिवाय संरक्षण मंत्रालयात मिलिटरी अॅफेअर्स विभागही स्थापन केला आहे. सीडीएस संरक्षणमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील.