दशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक संकटानंतर पहिल्यांदाच जगात पुन्हा एकदा अर्थव्यवस्था इतकी सुस्त दिसत असल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) वर्तवलं आहे. भारताचा विकास दरही आयएमएफनं घटवला आहे.
यंदा भारताचा विकास दर 7.3 टक्के राहील, असा अंदाज याआधी IMF नं वर्तवला होता. मात्र, आता यात बदल करून भारताचा विकास दर 6.1 टक्के राहणार असल्याचं म्हटलंय.
जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता एकूण विकास दर 3 टक्के राहील, असंही IMF नं म्हटलं आहे.
दरम्यान, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची आशा आहे, असं IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.