जेएनयूत झालेला हिंसाचार हाताळण्यात अपयश आल्याची टीका जेएनयूच्या कुलगुरूंवर होत असताना मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल त्यांचा बचाव करण्यासाठी समोर आले आहेत.
एका मुलाखतीत ते म्हणाले, "कुलगुरू उत्तम काम करत आहेत. जी लोकं चांगलं काम करतात त्यांच्यावर नेहमीच टीका होते. आम्ही त्यांच्यावर कारवाई करावी?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कुलगुरूंनी हा हिंसाचार होऊ दिला या आरोपाचाही त्यांनी इन्कार केला. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा अभाव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.