Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियानं पुन्हा केली दोन क्षेपणास्त्रांची चाचणी

Kim Jong Un's North Korea re-tests two missiles
, शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (14:53 IST)
उत्तर कोरियाने समुद्रात दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये उत्तर कोरियाकडून एकूण पाच क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली.
 
ही क्षेपणास्त्रे कमी अंतरावर मारा करणारी होती, असा दक्षिण कोरियाच्या लष्कराने दावा केला आहे.
 
उत्तर कोरियाने दोन क्षेपणास्त्रांचीच चाचणी केल्याच्या दक्षिण कोरियाच्या दाव्याला दुजोरा मिळाल्यास, ही चाचणी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांचं उल्लंघन ठरेल.
 
या चाचणीच्या काही वेळ आधीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं होतं की, 'त्यांना उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याकडून एक सुंदर पत्र आलंय.'
 
अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या युद्ध सरावामुळे उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन नाराज होते, असंही डोनल्ड ट्रंप यांनी सांगितलं.
 
क्षेपणास्त्रांची चाचणी नेमकी कुठे झाली?
उत्तर कोरियाने पूर्वेकडील समुद्रात म्हणजे जपानच्या समुद्रात ही क्षेपणास्त्रं डागली. हे ठिकाण दक्षिण हॅमग्योंग प्रांतातील हॅमहंगजवळ आहे.
 
दोन्ही क्षेपणास्त्रांमध्ये सुमारे 400 किलोमीटरचं अंतर निश्चित करण्यात आलं होतं. हे अंतर या दोन्ही क्षेपणास्त्रांनी स्थानिक वेळेनुसार 5.34 वाजल्यापासून 5.50 वाजेपर्यंत पूर्ण केलं.
 
दक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांनी मॅक 6.1 च्या तुलनेत अधिक गतीने कमाल 48 किलोमीटर इतकी उंची गाठली होती.
 
डोनाल्ड ट्रंप आणि किम जोंग उन यांच्यात जून महिन्यातच चर्चा झाली होती. अण्वस्त्र निशस्त्रीकरण करार पुन्हा सुरू करणं हा या चर्चेचा मुख्य विषय होता. मात्र, त्यानंतरही उत्तर कोरियाने एकामागोमाग एक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या.
 
किम यांनी ट्रंपना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय?
 
क्षेपणास्त्र चाचणीआधी किम जोंग उन यांनी डोनाल्ड ट्रंप यांना एक पत्र पाठवलं होतं. हे पत्र सकारात्मक असल्याचं ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
"मला वाटतंय, आम्ही पुन्हा एकदा भेटू. त्यांनी (किम) तीन पानांचं सुंदर पत्र लिहिलं आहे. म्हणजे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे पत्र अत्यंत सुंदर आहे." असं ट्रंप पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
webdunia
अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा संयुक्त युद्ध सराव
अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमधील युद्ध सराव येत्या 11 ऑगस्टपासून सुरु होणार असून, त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. हा संयुक्त युद्ध सराव मुख्यत्वे कॉम्प्युटर-सिम्युलेटेड असेल.
 
अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये याआधी झालेल्या युद्ध सरावांपेक्षा हा सराव वेगळा आणि महत्त्वपूर्ण आहे.
 
दुसरीकडे, हा युद्धसराव म्हणजे चिथावणी दिल्यासारखं आहे, असं उत्तर कोरियाला वाटतंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलम 370 : गूगलवर लोक सर्च करत आहे 'काश्मिरी मुलीशी लग्न कसे करावे'