Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपण किस का करतो?

webdunia
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (13:35 IST)
- मेलिसा होगेनबुम
तुम्हाला माहीत आहे का आपण चुंबन का घेतो?
 
प्रत्येकाला पहिलं किस किंवा चुंबन लक्षात असतं. किस ही प्रथा वाईट असो किंवा चांगली प्रेमात मात्र किसला नक्कीच अढळ स्थान आहे.
 
किस घेणं ही प्रथा तशी थोडी विचित्रच आहे. आपण आपली लाळ दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करतो आणि कधी कधी ही क्रिया खूप वेळ चालते. शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर एका किसमुळे 80 लाख बॅक्टेरिया एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असतात.
 
अस असतानाही किसला इतकं महत्त्व कसं आलं असेल? अनेक समुदायांमध्ये खरंच किसला एक आगळं महत्त्व आहे. पाश्चिमात्य समाजातील लोकांना असं वाटतं की चुंबन हा सार्वत्रिक वर्तणुकीचा भाग आहे. तर एका नवीन अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की अर्ध्याअधिक समाजांच मत मात्र याच्या उटल आहे. तर प्राण्यांमध्ये चुंबन अतिशय दुर्मिळच आहे.
 
समज गैरसमज
असं असेल तर किस मागची नेमकी प्रेरणा काय आहे? जर हे इतक उपयुक्त आहे, तर प्राणी का किस का करत नाहीत? आणि मानवातच हे का बघायला मिळतं? काही प्राणी किस का करत नाहीत, प्रश्नातच काही प्राणीच किस का करतात, या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे.
 
किस संदर्भात एक अभ्यासही करण्यात आला आहे. नेवाडा विद्यापीठातील संशोधकांनी 168 संस्कृतींचा अभ्यास यासाठी केला आहे. त्यापैकी फक्त 46 टक्के संस्कृतीत किस प्रेमभावनेने घेतलं जातं असं दिसून आलं आहे. या आधी झालेल्या अभ्यसात हे प्रमाण 90 टक्के असावं असा अंदाज करण्यात आला होता.
 
या नवीन अभ्यासात पालकांनी लहान मुलांचं चुंबन घेण्याचा समावेश करण्यात आलेला नाही. फक्त कपल्सनी ओठाचं किस घेण्याच्या वर्तणुकीचा यात अभ्यास करण्यात आला आहे.
 
भटकंती करणाऱ्या अनेक गटांमध्ये किस घेण्याची फार तीव्र इच्छा या अभ्यासात दिसून आलेली नाही. काही गटांनी तर चक्क किसच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आलं आहे. ब्राझीलमधील मेहिनेकू या जमातीने तर चुंबन अत्यंत वाईट आहे, असं सांगितलं आहे.
 
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागण्याआधी मानवप्राण्यांच्या इतिहासात माणूस कायम भटकंतीच करत आला आहे. जर सध्या भटकंती करणारे लोक जर किस घेण्यात जास्त रस दाखवत नसतील तर पूर्वजांनीसुद्धा यात फारसा रस दाखवलेला नसेल.
 
पण याबाबत नेमके पणाने सांगता येणं कठीण आहे. कारण सध्याचे भटकंती करणारे अनेक गट आता वेगळ्या सामाजिक परिस्थितीत राहत आहेत आणि त्यांनी बदलत्या परिस्थितीशी स्वत:ला जुळवून घेतलं आहे.
 
किसही हे रोमँटिक वर्तणूक असल्याची जागतिक संकल्पना असल्याचं मानलं जात. हा दावा मात्र या अभ्यासाने खोडून काढला आहे, असं नेवाडा विद्यापीठाचे विलियम जानकोविअक सांगतात. ते या अभ्यासगटाचे मुख्य होते.
 
चुंबन ही पाश्चिमात्य समाजाची संकल्पना असून त्यांनी ती इतर ठिकाणी पसरवली आहे, असं ते सांगतात.
 
ऐतिहासिक संदर्भ
"आपण जे किस घेतो त्याचा शोध नुकताच लागलेला शोध आहे," असं युकेमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील राफेल वोल्डारस्की सांगतात. चुंबनाच्या वर्तणांमध्ये कसा बदल झाला, या विषयावर त्यांनी अनेक संदर्भ तपासले आहेत.
 
चुंबनाबद्दलचा सर्वांत जुना संदर्भ हा हिंदू वैदिक संस्कृतीत 3500 वर्षांपूर्वीचा आहे. चुंबन म्हणजे एकमेकांचा आत्मा स्वत:त सामावून घेणं होय, असं यात म्हटलं आहे.
 
त्याचप्रमाणे इजिप्तच्या शिल्पकलेतील चित्रात लोक एकमेकांचं किस न घेता फक्त एकमेकांच्या जवळ आहेत, असं दाखवलेलं आहे.
 
मग हे प्रकरण नक्की काय आहे? किस ही एक नैसर्गिक क्रिया आहे की आपल्या संस्कृतीने दाबून ठेवलेली गोष्ट आहे? की आधुनिक मानवजातीचा हा शोध आहे?
 
प्राण्यांकडे पाहून आपल्याला या काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.
 
प्राणी कसं किस घेतात?
चिंपांझी आणि बोनोबो हे आपलं जवळचे नातेवाईक किस घेतात. अटलांटा येथील इमोरी विद्यापीठातील वंशशास्त्रज्ञ फ्रांस दे वाल चिंपांझींना भांडणांनतर मिठी मारताना आणि किस घेताना बघितल्याचं सांगतात.
 
चिंपांझींमध्ये किस हा सलोखा ठेवण्याचा मार्ग आहे. मादीपेक्षा नरांमध्ये किस घेण्याचं प्रमाण जास्त आहे, असं दिसून आलं आहे. म्हणजेच वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर किस रोमँटिक नाही.
 
त्यांचे चुलते समजल्या जाणाऱ्या बोनोबो प्रजातीत किसचं प्रमाण जास्त आहे. किस करताना ते जीभेचा जास्त वापर करतात. हे जास्त आश्चर्यकारक नाही. बोनोबो हे जास्त प्रमाणात लैंगिक समजले जातात.
 
जेव्हा दोन माणसं भेटतात तेव्हा ते हात मिळवण्याची शक्यता जास्त असते. तसं बोनोबो प्रजाती सेक्स करतात त्याला बोनोबो हँडशेक असं म्हटलं जातं. इतर प्रकारचे बंध दृढ करण्यासाठी ते सेक्सचा वापर करतात. म्हणून त्यांचं किस रोमँटिक नसतं.
 
'एप्स'मध्ये या दोन प्रजाती अपवाद आहेत. आपल्याला उपलब्ध माहितीनुसार प्राणी चुंबन घेत नाहीत. ते नाकाने किंवा चेहऱ्याने एकमेकांना स्पर्श करतात. ते आपली लाळ शेअर करत नाही, ओठ मुडपत नाही. त्यांना तसं करायची गरज नसते.
 
गंधाचा केमिकल लोचा
रानडुकरांचं उदाहरण घेऊया. नर एक विचित्र प्रकारचा गंध निर्माण करतात. मादींना तो गंध अतिशय आकर्षक वाटतो. त्यातसुद्धा 'फेरोमोन' हे महत्त्वाचं रसायन आहे. त्याला अंड्रोस्टिनोन म्हणतात, ज्यामुळे मादीला नराशी संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा होते.
 
मादीच्या दृष्टिकोनातून ही एक चांगली गोष्ट आहे. कारण अँड्रोस्टिनोन जास्त प्रमाणात असणाऱ्यां नरांची प्रजननक्षमता जास्त असतात. तिची ही गंधग्रहणाची क्षमता इतकी चांगली असते की तिला नराचं किस घेण्यासाठी नराच्या जवळ जाण्याची गरजच लागत नाही.
 
इतर सस्तन प्राण्यांचीसुद्धा वेगळी कथा नाही. उदाहरणात मादी हॅमस्टर नर हॅमस्टरकडे एक फेरोमोन पाठवते. त्यामुळे तो उद्दीपित होतो. उंदरांमध्येसुद्धा असंच काहीसं रासायनिक पॅटर्न आढळतो जेणेकरून जोडीदार जनुकीय पद्धतीने वेगळे आहेत का, याची चाचपणी करतात. त्यामुळे अपघाताने लैंगिक संबंध प्रस्थापित होण्याचा धोका टळतो.
 
प्राणी आपल्या मूत्रावाटे हे फेरोमोन्स सोडतात. म्हणून त्यांच्या मूत्राला जास्त गंध असतो. असं वाल्डोरास्की सांगतात, "त्यामुळे वातावरणात समजा मूत्र असेल तर त्यावरून संबंध प्रस्थापित करण्याबाबत अंदाज घेतला जातो."
 
फक्त सस्तन प्राणीच नाही, तर काळ्या कोळ्याचा गंध घेण्याची क्षमता चांगली असते. एक काळा नर कोळीमादी कोळिणीने फेरोमोन्स तयार केले आहेत हे सांगू शकतो. तसंच त्यावरून तिनं नुकतंच काही खाल्लं आहे की नाही हे त्याला कळतं. आपल्याला खाऊन टाकायची नराची भीती कमी होते. त्यामुळे जेव्हा मादीला भूक लागली नसते तेव्हाच, नर तिच्याशी संबंध ठेवतो.
 
किसमध्ये नक्की काय महत्त्वाचं?
त्यामुळे मुद्दा असा आहे की एखादा प्राणी संबंध ठेवण्यासाठी योग्य आहे की नाही, याचा अंदाज घेण्यासाठी त्यांना जवळ येण्याची गरज नसते.
 
त्याचवेळी माणसांनासुद्धा गंधाची उत्तम जाण असते. त्यामुळे एकमेकांच्या जवळ येण्याचा फायदा होतो. गंधामुळे एकमेकांची तंदुरुस्ती जोखता येते पण अभ्यासाअंती असं लक्षात आलं आहे की जोडीदाराच्या निवडीसाठीसुद्धा गंध फायदेशीर ठरतो.
 
1995 साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार उंदरांसारखंच स्त्रियांनासुद्धा जनुकीयदृष्ट्या वेगळे असलेल्या पुरुषांचा सुगंध त्यांना जास्त भावतो. हे चांगलं आहे, कारण वेगळे जनुक असलेल्या पुरुषांशी संबंध ठेवल्यामुळे आरोग्यदायी मुल जन्माला येण्याची शक्यता वाढते.
 
आपल्या जोडीदारांचा अंदाज घेण्यासाठी किस हा एक उत्तम मार्ग आहे.
 
2013 साली व्लोडारस्की यांनी किसच्या प्राधान्यक्रमाचा सविस्तर अभ्यास केला. किस करताना सर्वांत महत्त्वाचं काय असतं हे त्यांनी शेकडो जणांना विचारलं. त्यांनी गंधाचा कसा अभ्यास केला आणि स्त्रिया जेव्हा सगळ्यात प्रजननक्षम असतात तेव्हा गंधाचं काय महत्त्व असतं हे त्यांनी सांगितलं आहे.
 
त्यामुळे असं लक्षात आलं आहे की नर रानडुक्करसुद्धा एक प्रकारचं फेरोमोन तयार करतात जे स्त्रियांना आकर्षक वाटतं. हेच रसायन पुरुषांच्या घामात असतं आणि जेव्हा स्त्रिया जेव्हा याच्या संपर्कात येतात तेव्हा त्या थोड्याप्रमाणात उद्दीपित होतात.
 
व्लोडारस्की यांच्यामते सस्तन प्राणी आपला जोडीदार कसा शोधतात यासंदर्भात फेरमोन्सचं महत्त्व जास्त असतं. माणसांतसुद्धा त्याचे काही अंश दिसतात. "आपली उत्क्रांती सस्तन प्राण्यांपासून झाली आहे. आपण उत्क्रांतीच्या काळात आणखी काही गोष्टी जोडल्या आहेत," असं ते म्हणाले.
 
त्यामुळे किस दुसऱ्या व्यक्तीचं फेरोमोन्स जाणून घेण्यासाठीचा सांस्कृतिकदृष्ट्या मान्य झालेला एक मार्ग आहे, असं म्हणता येईल.
 
काही संस्कृतीत फक्त वास घेण्याच्या या वर्तणुकीत ओठांशी संपर्क येण्याचा समावेश झाला आहे, असं सांगण्यात आलं आहे. हे कधी झालं सांगता येणार नसलं तरी या दोन्हींचं उद्दिष्ट मात्र एकचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
त्यामुळे तुम्हाला एक चांगला जोडीदार हवा असेल तर चुंबन विसरून त्याचा गंध ग्रहण करायला सुरुवात करा. तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळेल आणि तुम्हाला अर्धे जंतूसुद्धा मिळणार नाहीत.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या प्रचलित...

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

धक्कादायक ! नवी मुंबईत दोन बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या