Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय बनावटीच्या 'प्रचंड' हेलिकॉप्टरची ही 11 वैशिष्ट्यं माहिती आहेत?

helicopter
, सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (14:00 IST)
भारताच्या हवाई दलात आता नवीन पध्दतीचं लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर दाखल झालंय. प्रचंड असं त्याचं नाव आहे. प्रचंड हेलिकॉप्टर भारतीय बनावटीचं आहे.
 
राजस्थानमधील जोधपूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत प्रचंड या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात सामील करण्यात आलीय.
 
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "स्वदेशी बनावटीचं पहिलं लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) हवाई दलात सामील होणार आहे. यासाठी मी 3 ऑक्टोबरला राजस्थानमधील जोधपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित असेन. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेला मोठी चालना मिळेल."
 
#AtmaNirbharBharat असा हॅशटॅग देत या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची झलक दाखवणारा व्हीडिओ भारतीय हवाई दलाने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
 
या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक पार पडली होती.
 
या बैठकीत 15 स्वदेशी विकसित लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरच्या खरेदीस मान्यता देण्यात आली होती. यासाठी 3,887 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
 
स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये
प्रचंड हेलिकॉप्टरची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने केली आहे.
प्रचंड हेलिकॉप्टर इतर लढाऊ हेलिकॉप्टरच्या तुलनेत वजनाने हलकं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचं वजन सुमारे 5.8 टन इतकं आहे.
कमी वजनामुळे हे हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रं आणि इतर शस्त्रांसह उंच भागातही टेकऑफ आणि लँडिंग करू शकतं.
रात्रीच्या वेळी हल्ले करण्याची क्षमता आणि क्रॅश झालेल्या स्थितीतही लँडिंग गियर ही या हेलिकॉप्टरची खास वैशिष्ट्ये आहेत.
प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या काही फिचर्समुळे ते सहजासहजी शत्रूच्या रडारवर येणार नाही.
जर शत्रूच्या हेलिकॉप्टर किंवा फायटर जेटने त्याचं क्षेपणास्त्र डागलं तर हे हेलिकॉप्टर त्या क्षेपणास्त्राचा मारा चुकवू शकतं.
कॉकपिटची सर्व फिचर्स पायलटच्या हेल्मेटवर डिस्प्ले करण्यात आली आहेत.
प्रचंड हेलिकॉप्टर्स उंचावरील भागात (सियाचीन) तैनात करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.
प्रचंड हेलिकॉप्टर्स सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लडाख आणि वाळवंटी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर तैनात केले जातील.
प्रचंड हेलिकॉप्टर्स उंचीवरील बंकर-बस्टिंग ऑपरेशन्स, जंगल आणि शहरी भागातील कारवायांसाठी तैनात केले जाऊ शकतात.
या 15 हेलिकॉप्टर्सपैकी 10 भारतीय हवाई दलासाठी आहेत आणि पाच लष्करासाठी आहेत.

Published By -Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE मॅचमध्ये खेळाडूंची धक्काबुक्की