Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र विधानसभा 2019 : निवडणुकीचा डिजिटल कार्यक्रम ‘राष्ट्र महाराष्ट्र’, जिथे तुम्ही विचाराल नेत्यांना थेट प्रश्न

महाराष्ट्र विधानसभा 2019 : निवडणुकीचा डिजिटल कार्यक्रम ‘राष्ट्र महाराष्ट्र’, जिथे तुम्ही विचाराल नेत्यांना थेट प्रश्न
, शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (10:16 IST)
निवडणूक म्हणजे प्रचाराची रणधुमाळी, विरोधकांचे आरोप आणि सत्ताधाऱ्यांचं प्रत्युत्तर, सभा गाजवणारी भाषणं, माध्यमांमधून तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या बातम्या...पण या सगळ्यामध्ये तुम्ही कोठे आहात?
 
म्हणूनच निवडणुकीच्या धामधुमीत तुम्हाला भेडसावणारे प्रश्न थेट तुमच्या नेत्यांना विचारण्याची संधी बीबीसी मराठी तुम्हाला देत आहे. राष्ट्र महाराष्ट्र या डिजिटल कार्यक्रमाच्या निमित्तानं.
 
या कार्यक्रमात तुम्ही नेत्यांना तुमच्या मोबाईल फोनवरून प्रश्न विचारू शकता. राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बीबीसी मराठी हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवेल.
 
आज दिवसभर पुण्यामध्ये या डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन बीबीसी मराठीने केलं आहे. या कार्यक्रमात राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते येणार आहेत. ते बीबीसी मराठीच्या आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत.
 
हा कार्यक्रम सकाळी 9.30 वाजता सुरू होऊन दुपारी 2.30 पर्यंत चालणार आहे.
 
कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, पुण्याचे खासदार गिरीष बापट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड तसंच शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे सहभागी होणार आहेत.
 
यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.
 
बीबीसी मराठीच्या वेबसाईट आणि सोशल चॅनल्सची सुरुवात 2 ऑक्टोबर 2017 रोजी झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत ही बीबीसी मराठीची पहिली हेडलाईन होती.
 
बीबीसी मराठीने गेल्या एक-दीड वर्षांत मराठी पत्रकारितेत अनेक गोष्टी पहिल्यांदा केल्या.
 
• पूर्णतः डिजिटल असलेलं हे मराठीतलं पहिलंच व्यासपीठ.
 
• बातम्या सांगण्याच्या पद्धतीत नवनवीन प्रयोग केले. 360 डिग्री व्हीडिओ आणि VR (Virtual Reality) व्हीडिओ मराठीत पहिल्यांदाच केले.
 
• जागतिक बातम्या मराठीत नियमितपणे देणारं पहिलं व्यासपीठ.
 
• महिला, दलित, धार्मिक अल्पसंख्याक आणि लैंगिक अल्पसंख्याकांना समान हक्क मिळावेत यासाठी बीबीसी मराठी नेहमी पुढाकार घेतला.
 
• प्रत्येक परिस्थिती बीबीसी मराठीने निष्पक्ष बातम्या देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तुमच्या कौतुकाची थापही मिळवली.
 
• बीबीसी मराठीच्या अनेक बातम्यांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात थेट चांगला बदल घडला.
 
• बीबीसी मराठीने सदैव किचकट विषय सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला.
 
• भारतातले आघाडीचे विचारवंत प्रा. सुहास पळशीकर आणि इतर अनेक मान्यवरांचं लिखाण तरुणांपर्यंत आणलं.
 
• सर्वांत महत्त्वाचं म्हणजे Jio TV अॅपवर भारतातलं पहिलं डिजिटल व्हीडिओ स्ट्रीमिंग सुरू केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकलट्रेन : महिलेला महिलेने चावा घेतला सोबत बेदम मारहाण