Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईतली धुळ गेल्या 15 वर्षांत दुपटीनं वाढली

मुंबईतली धुळ गेल्या 15 वर्षांत दुपटीनं वाढली
, सोमवार, 20 मे 2019 (09:35 IST)
मुंबईला किनारी वारे लाभले असले तरी हे वारे हवेतले प्रदूषित घटक कमी करण्यास असमर्थ ठरत आहेत, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे. गेल्या 15 वर्षांत मुंबईल्या हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारली आहे. पण हवेतले धुळीचे कण मात्र वाढले आहेत.  
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या हवेत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजनच्या ऑक्साईड्सची पातळी कमी झाली असली तर हवेतले धुळीचे कण लक्षणीयरित्या वाढले आहे.
 
केंद्रीय सांख्यीकी कार्यालयानं 'EnviStats-India 2019' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 2001मध्ये धुळीचं प्रमाण दरचौरस मीटर भागातत सरासरी 67.2 मायक्रोग्रॅम इतकं होतं. तेच प्रमाण 2017 मध्ये वाढत 151 मायक्रोग्रॅम इतकं झालं आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१ जून ते ३१ जुलै मासेमारीला बंदी