"बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात," असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केलं आहे.
"राज ठाकरे हे पहिल्यापासून बाळासाहेबांच्या विचारावर चालत होते. कडवट शिवसैनिकांना विचाराल तर तेदेखील यासंदर्भात राज ठाकरेंचंच नाव घेतील. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी साजेशी आहे," असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून भाषण करुन अंतरंग भगवं होत नाही असाही टोला लगावला.
"बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीही त्यांना अभिवादन केलं नाही. या गोष्टी शिवसेना, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?" असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला.