Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं निधन

प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं निधन
, सोमवार, 17 जानेवारी 2022 (12:41 IST)
प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं आज (१७ जानेवारी २०२२) दुपारी १२ वाजता कोल्हापुरातील खासगी रुग्णलयात निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९२९ला सांगलीतल्या ढवळी गावात अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता. १९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. १९५७ साली ते मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस झाले.

तर १९६०-६६, १९७०-७६, १९७६-८२ अशी १८ वर्षं ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते.
१९६९- १९७८, १९८५ - २०१० या दरम्यान ते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस होते.
१९७८-१९८० दरम्यान ते सहकारमंत्री होते.
१९८५-१९९० दरम्यान ते महाराष्ट्र विधानसभेत कोल्हापूरचे आमदार राहिले.
१९९९-२००२ ते लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक होते.

एन. डी. पाटील यांचं शैक्षणिक क्षेत्रातील कार्य
शिवाजी विद्यापीठ - पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ - सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ - कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ - सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन - १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष - १९८५ पासून

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IITच्या विद्यार्थ्याची होस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या