नववर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रशासनाकडून भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार आहे.
असं असलं तरी, मुंबई लोकलच्या तिकीटदरात कोणतीही वाढ झालेली नाही.
उद्यापासून रेल्वेची भाडेवाढ लागू होणार आहे. एसी आणि नॉन-एसी मेल आणि एक्स्प्रेसवर भाडेवाढ केली जाणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार नॉन एसी सेकंड क्लाससाठी प्रत्येक किलोमीटरमागे एक पैसा, स्लीपर क्लाससाठी प्रत्येक किलोमीटरमागे एक पैसा आणि फर्स्ट क्लाससाठी प्रत्येक किलोमीटरमागे एक पैसा अशी भाडेवाढ करण्यात आलीय.