Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र सरकार स्थापना : पाच वर्षं शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, तिन्ही पक्षांची सहमती - संजय राऊत

महाराष्ट्र सरकार स्थापना  : पाच वर्षं शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, तिन्ही पक्षांची सहमती - संजय राऊत
, शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (11:47 IST)
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक सुरू आहे.
 
शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण असेल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, त्यावर तिन्ही पक्षांची सहमती आहे. कुणी वेगळी ऑफर दिली असेल तर त्यांचा सेल संपलेला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
आता कुणी इंद्राचं आसन दिलं तर ते आम्हाला नको, असं त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफरच्या चर्चेच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलंय.
 
"मी शिवसैनिक म्हणून काम केलं आहे, सर्वांची इच्छा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतं," असं राऊत यांनी त्यांच्या नावाच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत उत्तर देताना म्हटलंय.
 
शिवसेना आमदारांची बैठक
शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सहमती झाल्यानंतर आज अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता आहे. तिन्ही पक्षांनी एकत्रित पाऊल टाकलं तर सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1 डिसेंबरपर्यंत मोफत मिळणार फास्टॅग