Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

काश्मीरमध्ये स्थिती सामान्य - अमित शाह

situation is normal in Kashmir - Amit Shah
, गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (11:18 IST)
5 ऑगस्ट नंतर जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना खूप कमी झाल्या आहेत आणि यादरम्यान एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत स्पष्ट केलं. 
 
काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत आहे. काश्मीरमध्ये लवकरात लवकर इंटरनेट सुविधा देणं, ही सरकारची प्राथमिकता आहे. औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. औषधांसाठी मोबाइल व्हॅनचाही वापर केला जात आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, संपूर्ण देशभरात NRC लागू केली जाईल, अशी अमित शाह यांनी संसदेत केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही - संजय राऊत