टी 20 मालिका : भारताचा बांगलादेशवर विजय

सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (11:24 IST)
बांगलदेशविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतानं मालिकाही जिंकली आहे. भारतानं 2-1 असा या टी-20 मालिकेवर विजय मिळवला आहे.
 
श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांची अर्धशतकं यामुळं भारतानं बांगलादेशपुढे 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. तर भारतीय गोलंदाज दीपक चहरची हॅटट्रिक साधली. चहरनं 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. 'सामनावीर' म्हणूनही चहरला गौरवण्यात आलं.
 
भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची दमछाक झाली. नईम आणि मिथून यांची भागीदारी सुरू असतानाच मिथून 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर नईमही 81 धावांवर परतला. त्यामुळं बांगलादेशचा डाव 144 धावांवरच आटोपला.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख महाराष्ट्र सत्तासंघर्ष : भाजप विरोधी पक्षात बसण्यासाठी तयार पण आम्हाला मुख्यमंत्रिपद देण्याची त्यांची तयारी नाही - शिवसेना