विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. "ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावं लागतं," असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या बातमीवरून शिवसेनेवर टीका केली होती.
"ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी खरं आणि तत्वनिष्ठं असावं लागतं. लोकांच्या भल्यासाठी काम करावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्ता यांच्या कार्यपद्धतीपेक्षा लोक आणि पक्षाच्या सदस्यांच्या हितासाठी तत्त्वनिष्ठ विचार करण्याची गरज असते," असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.