Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाविकास आघाडी सरकार 50 दिवसही चालणार नाही - रामदास आठवले

महाविकास आघाडी सरकार 50 दिवसही चालणार नाही - रामदास आठवले
महाविकास आघाडीचे सरकार 50 वर्षे चालेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असले, तरी हे सरकार 50 दिवसही चालणार नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यवतमाळमध्ये म्हणाले.
 
भाजपच्या चहापानाच्या बहिष्कारावर उद्धव ठाकरेंनी केलं 'हे' वक्तव्य
 
राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन व्हावे, अशी इच्छाही आठवलेंनी व्यक्त केलीय.
 
सावरकरप्रेमी शिवसेनेचा पाठिंबा काँग्रेसने काढावा आणि शिवसेनेने सावरकरविरोधी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालवू नये असं आवाहन देखील आठवलेंनी केलं.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात गेले असताना, तिथं म्हणाले होते की, हे सरकार पाच वर्षेच काय, पुढची 25 वर्षे टिकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Manoj Mukund Naravane: लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे होणार भारताचे नवे लष्करप्रमुख