Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआप पडेल- चंद्रकांत पाटील

सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआप पडेल- चंद्रकांत पाटील
"राज्यामध्ये 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जवळपास एक महिन्याने सरकार स्थापन करायला गेला. त्यानंतर खातेवाटप करण्यासाठी एक महिन्याचा काळ गेला. त्यामुळे हे अनैसर्गिक सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआपच पडेल", असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
 
"या सरकारने फसवी कर्जमाफी केली आहे. 2001 ते 2016 पर्यंतची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी भाजप सरकारने केली होती. त्यामुळे या अनैसर्गिक सरकारने 2016 नंतरची अट लावून कोणती कर्जमाफी केली", असा प्रश्न त्यांनी विचारला. या सरकारला अजूनही एकर आणि हेक्टरची माहिती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
 
"या सरकारचे खातेवाटप, बंगलेवाटप, पदवाटप झाले, महामंडळ वाटप होईल. मात्र हे सरकार शेतकऱ्यांना काहीच देऊ शकत नाही", असा आरोप त्यांनी केला. ते इंदापूर कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी पराभूत