"पालघरची घटना अत्यंत दुर्देवी आहे. मी ही घटना कधीही विसरू शकणार नाही. 70वर्षीय संताला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेने प्रचंड दु:ख झालं आहे. व्हीडिओमध्ये गुन्हेगार स्पष्ट दिसत आहेत. पोलीसही दिसत आहेत. तरीही हे महापाप झालं. उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल," असं माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी म्हटलं आहे.
जुन्या आखाड्यासोबत जवळचे संबंध आहेत. देशाने या घटनेची निंदा करायला हवी, असं त्या पुढे म्हणाल्या.
पालघरपासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर गडचिंचले गावात जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी शंभरहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान कोणीही याप्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये, हे सगळं गैरसमजूत, अफवा यातून घडलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.