आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापुरातील राधानगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना साधा उमेदवार मिळाला नसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
दुसरीकडे अहमदगरमध्ये शरद पवार यांनी भाजपवर टीका केलीय. ते म्हणाले, "शेतकऱ्यांनो, भाजपचे नेते तुमच्या दारात मतं मागायला येतील. त्यांना दारात उभं करू नका."
शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणारं हे सरकार आहे, त्यांना मत देऊ नका, असं शरद पवार म्हणाले. लोकसत्तानंही बातमी दिलीय.