Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चमचम

- अर्चना भटूरकर

चमचम
ND
साहित्य : एक किलो पनीर, एक सपाट वाटी मैदा किंवा आरारूट किंवा शिंगाड्याचे पीठ, चिमटीभर सोडा, केशर किंवा केशरी रंग.

कृती : एक किलो पनीर घेऊन त्यात एक सपाट वाटी मैदा व चिमटीभर सोडा घालावा व पाहिजे असल्यास केशर (पूड करून) किंवा केशरी रंग घालून, पनीर हलक्या हाताने लवकर मळून घ्यावे. नंतर त्यांचे लांबट आकाराचे गोळे करावेत. साखरेचा कच्चा पाक तयार करावा व पाक उकळत असतानाच त्यात बारीक गोळे सोडावेत व खूप आच आणावी. पाक घट्ट (पक्का) होऊ नये, म्हणून मधूनमधून पाण्याचा हबका मारावा. चमचम दहा मिनिटे उकळल्यावर एका भांड्यात पाणी घेऊन, त्यात एक चमचम टाकून पाहावा. तो एकदम खाली गेल्यास चमचम शिजून तयार झाले, असे समजावे. पण पाण्यात तरंगल्यास चमचम पाकात आणखी उकळू द्यावेत व पूर्ण शिजल्यावर पातेले खाली उतरवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi