साहित्य : 1लहान कांदा, 2 ग्रॅम आले, 2 लवंगा, 2 तुकडे दालचिनी, 1 कप पाणी, 750 ग्रॅम अत्यंत लहान आकाराचे बटाटे, 1 छोटा चमचा हळद, 1 कप तेल, 1 तमाल पत्र, 1/2 चमचा जिरे, 1 कांदा, टोमॅटो चिरलेला, 2 चमचे तिखट, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पूड, मीठ चवीप्रमाणे, 1/2 चमचा साखर, 1 मोठा चमचा तूप.
कृती : कांदा व आल्याचे पेस्ट करा व लवंगा आणि वेल्याची पूड तयार करा. बटाटे शिजवून घ्या. बटाटे सोलून 1 /2 चमचा हळद टाकून चांगले मिसळा. बटाटेचे 3 भाग करा. कढईत तेल गरम करून तमालपत्र आणि जिरे घाला. काही सेकंद ढवळा. चिरलेला कांदा घालून बदामी होईपर्यंत परता. त्यात पेस्ट घालून 2 मिनिटे परता. नंतर टोमॅटो, मिरची पूड, जिरे, धने पूड, मीठ साखर आणि उरलेली हळद घाला. मधून मधून ढवळत तेल सुटेपर्यंत शिजवा. बटाटे घाला. लवंग, दालचिनीची पूड आणि उरलेले पाणी घालून 5 मिनिट शिजवा. सर्व्ह करताना तूप सोडा व गरम गरम वाढा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा