साहित्य : 4 चमचे तांदूळ, 2 चमचे बदामाचे काप, 1 चमचा पिस्त्याचे बारीक काप, 8 चमचे साखर, 1/2 चमचा इसेन्स, 2 चमचे तुटी फ्रूटी, 750 मिली लीटर दूध, 1/2 चमचा वेलची पूड.
कृती : तांदुळाला स्वच्छ धुऊन चार तासासाठी भिजत ठेवावे. बदामाला भिजवून त्याची सालं काढून घ्यावी. अर्धे बदाम तांदुळासोबत वाटून घ्यावे. दूध उकळून त्यात साखर व तांदळाची पेस्ट घालून चांगले एकजीव करावे. मिश्रण जेव्हा घट्ट झाल्यावर थंड करून त्यात इसेन्स घालावा. सर्विंग बाउलमध्ये थोडी तुटी-फ्रुटी घालून त्यावर मिश्रण घालावे. वेलची पूड, पिस्ता व बदामाचे काप घालून सजवावे. फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा