साहित्य : 2 कप कॉर्न फ्लॉवर, 1/4 कप कणीक, 2 मोठे चमचे तूप, 3/4 चमचे मीठ, दीड कप बेक्ड बीन्स, 1 मोठा चमचा कोथिंबीर चिरलेली, 100 ग्रॅम पनीराचे तुकडे, 1 चमचा लोणी, तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम कॉर्न फ्लॉवर, कणीक, मीठ एकत्र करून चाळणीने चाळून घ्यावे. तुपाचे मोहन घालून कणीक मळून घ्यावी. कणकेचे गोळे बनवून गोल किंवा त्रिकोणी मुटकुळे तयार करावे. तेल गरम करून ते तळून घ्यावे. नंतर लोणी गरम करून त्यात बेक्ड बीन्सला गरम करून तळलेले मुटकुळे त्यावर टाकावे. चिरलेला कांदा व कोथिंबीर त्यात घालून पनीरच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा