साहित्य : 125 ग्रॅम मारी बिस्किटे, 50 ग्रॅम ड्रिंकिंग चॉकलेट, 50 ग्रॅम सुकवलेले खोबरे, पाव वाटी लोणी, पाऊण वाटी पिठीसाखर थोडेसे दूध.
कृती : प्रथम बिस्किटांची पावडर करावी. दुधात अर्धी साखर व ड्रिंकिंग चॉकलेट घालून ही पावडर भिजवावी. नंतर लोणी फेसून त्यात उरलेली साखर व किसलेले खोबरे घालावे. नंतर भिजवलेल्या बिस्किटाच्या पिठाचे व खोबऱ्याच्या सारणाचे सारखे भाग करावे. पोळपाटावर प्लॅस्टिकच्या कागदांवर पिठाची पोळी लाटावी व त्यावर सारण पसरावे. नंतर या पोळीची घट्ट गुंडाळी करून एक तास फ्रीजमध्ये ठेवावी. नंतर वड्या पाडाव्यात. दोन रंगातील या वड्या चांगल्या लागतात. या वड्या फ्रीजमध्येच ठेवाव्यात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा