साहित्य : मध्यम आकाराच्या फिशचे तुकडे, 1/4 तेल, 1 लहान कांदा, 1 चमचा लसूण पेस्ट, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा धने पूड, तिखट, 1/2 चमचा जिरे पूड, हळद, 1/2 चमचा कसुरी मेथी, चिमटीभर आमचूर पावडर.
कृती : सर्वप्रथम फिशच्या तुकड्यांना अर्धा तास मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवावे नंतर फिशला स्वच्छ पाण्याने साफ करावे. कांद्याला बारीक कापून कढईत सोनेरी होईपर्यंत परतावे. त्यात बाकी मसाल्याचे साहित्य टाकून 5 मिनिट शिजवावे. त्यात फिश टाकून 2 मिनिट ठेवावे व 1/2 कप पाणी घालून 5 मिनिट शिजवावे. या फिशकरीला भातासोबत सुद्धा सवर्ह करू शकतो.