साहित्य : चार बटाटे, दोन रताळे, दोन कारली, चार लहान वांगे, दोन इंच आल्याचे तुकडे, दोन लहान चमचे जीरे, एक लहान चमचा मोहरीची डाळ, दोन लहान चमचे खसखस, अर्धा लहान चमचा हळद, एक लहान चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, चार मोठे चमचे तेल.
कृती : सर्व भाज्यांचे तुकडे करून घ्या. ते मऊ होत नाही तोवर उकळून घ्या. आलं व जिर्याचे पेस्ट तयार करावे. खसखसीला गरम पाण्यात टाकून त्याची पेस्ट करावी.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरीची डाळ टाकावी. भाज्या, मीठ व तिखट टाकून पाच मिनिट हलवून घ्या. जिरा व आलाची पेस्ट टाकून शिजवावे. त्यानंतर त्यात खसखस पेस्ट व हळद टाकावी. शिजल्यावर कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.