Article Bengali Dishes Marathi %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be %e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%88 109042200008_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाप्पा दोई

(वाफवलेले गोड दही)

दही कन्डेन्स्ड मिल्क बदाम पिस्ते पाणी
ND
साहित्य : 1 कप दही घुसळलेले, 1 कप दूध, 1 डबा गोड कन्डेन्स्ड मिल्क, 5 बदाम गरम पाण्यात भिजवून, सोलून काप कलेले, 10 पिस्ते कापलेले, 5 बेदाणे, 2 कप पाणी.

कृती : सर्वप्रथम दही, दूध आणि कन्डेन्स्ड मिल्क एकजीव होईपर्यंत एकत्र घुसळा. बदाम, पिस्ते आणि बेदाणे घाला. चांगले मिसळा. हे मिश्रण 1 लिटर पुडिंगच्या साच्यात ओतून साचा घट्ट बंद करा. कुकरमध्ये पाणी घालून जाळीवर हा साचा ठेऊन 20 मिनिटे शिजवा. कुकर थंड झाल्यावर साचा काढून उघडा. सर्वसाधारण तापमानापर्यंत थंड करा. पाणी असल्यास निथळून टाका. वाढायच्या वेळेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा. वाढायची डिश साच्यावर उलटी ठेवून साचा उलटा करा. सुटण्यासाठी हळूच हलवा. साचा काढा. भाप्पा दोई असे थंडगार वाढा.

Share this Story:

Follow Webdunia marathi