साहित्य : दूध 1 लीटर, 1 पिकलेला आंबा, 1 चमचा बदाम गिरी, 1 चमचा पिस्त्याचे काप, वेलची पूड 1/4 चमचा, साखर चवीनुसार.
कृती : दूध उकळून घ्यावे व अर्ध्या दुधात लिंबाचा रस किंवा दही घालून त्याचे पनीर तयार करावे. बाकी उरलेल्या दुधाला रबडी सारखे घट्ट करावे. पनीराला कुस्करून रबडीत घालून, साखर टाकावी. थंड करून सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यावे व त्यात पिस्ता, बदाम, वेलची पूड आणि आँब्याचे लहान लहान तुकडे कापून टाकावे. फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा