साहित्य : अर्धा लिटर दूध, पाव लिटर दही, एक किलो साखर, एक वाटी पिठीसाखर, चारोळी, बदामाचे काप, वेलदोड्यांची पूड.
कृती : दूध गरम करून, नंतर गार करून घ्यावे. एका पातेल्यात दूध, दही व साखर एकत्र करून मिश्रण करावे. नंतर विस्तवावर ठेवून ते मिश्रण चांगले घोटावे. मिश्रण घट्ट होन आल्यावर ते खाली उतरवून, त्यात पिठीसाखर व वेलदोड्यांची पूड घालून चांगले मिसळावे व ताटाला तुपाचा हात लावून त्यावर ते मिश्रण थापावे. त्यावर बदामाचे काप व चारोळ्या घालून लहान लहान वड्या पाडाव्यात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा