कृती : बटर व कस्टर्ड मिल्क एकजीव करून चांगले फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर, सोडा, कलर आणि इसेंस घालून चांगल्याप्रकारे फेटून घ्यावे. नंतर त्यात दूध घालून परत फेटावे. केक पात्राला चारी बाजूने तुपाचा हात लावून त्यावर थोडा मैदा लावावा व त्या मिश्रणाला भांड्यात ओतून 180 डिग्री सें. वर 25 मिनिट बेक करावे.
फ्रॉस्टिंग साठी लोणी आणि आयसिंग शुगरला एकजीव करून फेटून घ्यावे. फेटताना त्यात कोको पावडर, रंग आणि इसेंस घालावा. चॉकलेट डेकोरेशनसाठी चॉकलेटचे तुकडे करून दुधात विरघळावे. केकला दोन भागात कापावे. 1/2 भागावर 1/4 फ्रॉस्टिंगचे मिश्रण पसरवून द्यावे व दुसरा भाग त्यावर ठेवून केक थंड करून वर चॉकलेट पसरवून सर्व्ह करावे.