rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लवंगलोतिका

लवंगलोतिका
ND
साहित्य : दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, ‍चिमटीभर मीठ, दहा-15 लवंगा, नारळाची अर्धी वाटी, चारोळी, साखर, केशर किंवा केशरी (खाण्याचा) रंग.

कृती : मैद्यात तूप व एक चिमटीभर सोडा घालून, मैदा गरम पाण्यात घट्ट भिजवून घ्यावा. नारळ खोवून व खोबर्‍याच अर्धी साखर घेऊन, खोबरे व साखर एकत्र करून, शिजवून, सारण तयार करून घ्यावे. त्यात चारोळी घालावी. साखरेचा दोन-तारीपेक्षा जरा जास्त घट्ट पाक करून घ्यावा व त्यात केशर किंवा केशरी रंग घालावा.

नंतर मैदा मळून त्याच्या पुरीएवढ्या पापड्या लाटाव्यात. पापडीच्या मध्यावर अर्धा चमचा सारण घालून प्रथम पापडीच्या समोरासमोरच्या दोन बाजू सारणावर दुमडाव्या व नंतर दुसऱ्या दोन बाजू एकमेकांवर न येता एकमेकांना चिकटतील, अशा रीतीने दुमडाव्या. त्या दुमडलेल्या प्रत्येक बाजूवर एक एक अशा दोन लवंगा टोचाव्यात. याप्रमाणे बाकीच्या पापड्या कराव्यात व मंद विस्तवावर तळून साखरेच्या गरम पाकात सोडाव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi